पेट्रोल-डिझेलचे भाव भडकण्याच्या मार्गावर! तेल कंपन्या पुन्हा दर वाढवण्याच्या प्रयत्नात?

Foto
मुंबई : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज (रविवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. महत्वाचे म्हणजे, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटची दरवाढ २०२२ मध्ये केली होती. मात्र, दुसरीकडे खाजगी तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली आहे. मात्र हे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

१ एप्रिल रोजी खाजगी कंपनी शेल इंडियाने पेट्रोलच्या दरात ७.४ रुपये प्रति लीटर आणि डिझेलमध्ये २५ रुपये प्रति लीटर, अशी वाढ केली. या वाढीनंतर शेल इंडियाचे पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तसेच, पॉवर पेट्रोलही १२९.८५ रुपये तर प्रीमियम डिझेल १३३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.

नायरानेही वाढवले आहेत भाव  
मार्च महिन्यात नायरा या खाजगी तेल कंपनीनेही इंधन दरात मोठी वाढ केली. मध्य पूर्वेतील तणावामुळे कंपनीने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपयांनी महाग केले होते. त्यानंतर किमती स्थिर आहेत. 
याशिवाय, इंडियन ऑईलने १ एप्रिल रोजी एक्सपी १०० या प्रीमियम पेट्रोलच्या दरात ११ रुपयांची वाढ केली. ते १६० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर प्रीमियम डिझेल दर वाढीनतंर ९२.९९ रुपयांवर पोहोचले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले होते. मात्र, आता हे दर १०० डॉलरच्या खाली आले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून टँकर जाऊ देण्याचे संकेत दिल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ही घसरण बघायला मिळत आहे.